इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – निसर्गतः तथा परमेश्वराने स्त्री आणि पुरुष असे दोन जीव तथा वर्ग निर्माण केले आहेत, परंतु काही वेळा जन्मतःच शारीरिक समस्यामुळे स्त्री – पुरुषांच्या शरीरात अचानक अंतर्गत बदल निर्माण होतात त्यातून पुढील काळात अनेक अडचणी निर्माण होतात, चीनमधील एका तरुणाच्या बाबतीतही असाच प्रकार घडला.
चीनच्या सिचुआन प्रांतातील चेन ली या तरुणाला अनेक वर्षांपासून लघवीमध्ये रक्त येत होते. त्यामुळे तो तपासण्यासाठी डॉक्टरांकडे गेला तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले की, तो पुरुष नसून एक महिला आहे, कारण त्याच्या शरीराच्या आतील भागात महिलांचे अवयव आहेत. शरीरात अंडाशय आणि गर्भाशय आहे. तो जन्माला आला तेव्हा त्याच्या शरीरात पुरुषांचे जननेंद्रिय तसेच महिलांचे लैंगिक गुणसूत्र होते. त्यामुळे रक्त नसून तिला मासिक पाळी येत आहे.
हे चक्र गेली 20 वर्षे सुरू होते, म्हणजे त्याला कळतही नव्हते आणि त्याला अनेक वर्षांपासून मासिक पाळी येत होती. या तरुणाला आणि डॉक्टरांनाही धक्का बसला. तरुणाने डॉक्टरांना सांगितले होते दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्याचे स्त्री अवयव काढले असून आता तो पुरुषाप्रमाणे सामान्य जीवन जगू शकणार आहे. पण आता त्यांच्यासोबत एक समस्या नेहमीच असेल ती म्हणजे त्यांना आयुष्यभर मुले होऊ शकणार नाहीत. त्यांचे अंडकोष शुक्राणू म्हणजे टेस्टिकल्स स्पर्म्स तयार होऊ शकणार नाहीत, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.
Shocking 33 Year Old Young Men Menstruation Doctor