इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काही वर्षांपूर्वी क्रिकेट विश्वाला सर्वात मोठा धक्का देणारा प्रकार फिक्सिंगच्या रूपाने जगापुढे आला होता. तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिए याला दोषी ठरविण्यात आले होते. त्या फिक्सिंगचे धागेदोरे भारतात आढळले होते. तेव्हापासून आजतागयत फिक्सिंगचे दुष्टचक्र काही थांबलेले नाही. नुकत्याच प्रकाशित झालेल्यास्पोर्टडार इंटिग्रिटी सर्व्हिसेसच्या अहवालानुसार, २०२२ मध्ये १३ क्रिकेट सामन्यांमध्ये फिक्सिंग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
२०२२ मध्ये ९२ देशांमधील १२ क्रीडा स्पर्धांमध्ये १२१२ सामने झाले, जे संशयास्पद होते. ‘स्पोर्टडार इंटिग्रिटी सर्व्हिसेस’ ही तज्ञांची आंतरराष्ट्रीय टीम आहे. जी अनियमित सट्टेबाजी, सामन्यांची चौकशी करते. जी बेकायदेशीर बेटिंग, मॅच फिक्सिंग आणि खेळातील भ्रष्टाचाराच्या इतर प्रकारांचे विश्लेषण करते. सामन्यातील कोणत्याही प्रकारची हालचाल शोधण्यासाठी कंपनी युनिव्हर्सल फ्रॉड डिटेक्शन सिस्टम अप्लिकेशन वापरते.
या अहवालानुसार फुटबॉल हा खेळ भ्रष्टाचाराच्या बाबतीत अव्वल ठरला आहे. गेल्या वर्षी एकूण ७७५ फुटबॉल सामने झाले. ज्यात फिक्सिंगचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या यादीत बास्केटबॉल दुसऱ्या क्रमांकावर आहे. ज्यांचे २२० सामने संशयास्पद होते. तिकडे लॉन टेनिसच्या ७५ सामन्यांवर प्रश्न निर्माण झाला. या यादीत क्रिकेट सहाव्या क्रमांकावर आहे आणि केवळ १३ सामने असे होते ज्यात भ्रष्टाचाराचा आरोप आहे.
स्पोर्टडार इंटिग्रिटी सर्व्हिसेसद्वारे नोंदवलेले १३ क्रिकेट सामने संशयास्पद आहेत. अहवालात दाखवलेल्या ग्राफिक्सनुसार, भारतात खेळल्या गेलेल्या कोणत्याही क्रिकेट सामन्यात फिक्सिंग झालेले नाही. स्पोर्टडारने २०२० मध्ये आयपीएल सामन्यांदरम्यान बेटिंगमधील अनियमितता शोधण्यासाठी बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी युनिटसोबत भागीदारी केली.
Shocking 2022 Report 13 Cricket Matches Fixed Suspect