इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत वंचित बहुजन आघाडीने युती केली आहे. यानिमित्ताने शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे. राज्याच्या राजकारणात एक नवा प्रवाह सुरू झाला आहे. ही युती होणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी या युतीची घोषणा करण्यात आली. या युतीचे भवितव्य काय, या युतीमुळे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार यासह अनेक बाबी सध्या चर्चिली जात आहेत. आणि प्रश्नही विचारले जात आहेत. यासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी विश्लेषण केले आहे. बघा, त्याचा हा व्हिडिओ
(वरील विचारांशी इंडिया दर्पण माध्यम समूह सहमतच असेल असे नाही)
Shivshakti Bhimshakti Maharashtra Politics Analysis Video