नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातून शिवशाहीचा प्रवास आता संपणार असल्याची शक्यता असल्याच्या बातम्यावर एसटी प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, महामंडळाकडे ८९२ शिवशाही वातानुकूलित बसेस असून त्यात कोणताही दोष नाही. त्यामुळे या बसेस बंद करण्याचा कोणाताही विचार नाही. आज ५०० बस रस्त्यावर धावत असून ३९२ बसेस या कार्यशाळेत विविध कारणांसाठी दाखल झाल्या आहेत.
गेल्या काही दिवसात वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने शिवशाही बसची सेवा थांबविण्याचा निर्णय घेऊ शकतात आहे. शिवशाही बस गाड्यांमध्ये तांत्रिक दोष असल्याचे निष्पन्न झाले असे सांगण्यात येत होते. शिवशाही बसच्या अंतर्गत व बाह्य रचनेत आवश्यक तो बदल केला जाणार असून त्याचे रूपांतर साध्या अर्थात ‘लालपरी’ बसमध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती
त्याचप्रमाणे गोंदिया येथे शिवशाही बसच्या अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यापूर्वीदेखील शिवशाही बसचे अपघात झाले होते. शिवशाही बसचे होणारे अपघात पाहता आधापासून त्यात तांत्रिक दोष असल्याचे समोर आले आहे. वारंवार तक्रारी वाढल्याने एसटी प्रशासनाच्या वाहतूक विभागाने शिवशाहीला सेवेतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे वृत्त होते. पण, त्यात काही तथ्य नसल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले.