इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “अन्याय्य शासन निर्णयाच्या प्रतीकात्मक होळी” कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे हे उपस्थितीत होते.
यावेळी हिंदी सक्तीचा शासन निर्णय प्रतिकात्मकरित्या फाडून त्याची होळी करण्यात आली. आमचा हिंदी भाषेला विरोध नाही, हिंदीसक्तीला विरोध आहे, हीच भूमिका सर्वांची होती. मराठी भाषेच्या अस्मितेवर गदा आणणाऱ्या कोणत्याही निर्णयाविरोधात शिवसेना कायमच ठामपणे उभी राहणार असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
मुंबईत मराठी पत्रकार संघ कार्यालय परिसरात ही प्रतिकात्कम होळी करण्यात आली. या आंदोलनात मराठी कलाकारही सहभागी झाले. मुंबईबरोबरच राज्यभर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जीआरची होळी केली. या आदोलनात महाविकास आघाडीचे इतर घटक पक्षही सहभागी झाले.