नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रे निमित्त नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी शुक्रवारी काळाराम मंदिर येथे श्री प्रभू रामाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिरामध्ये जातांना त्यांचा हा फोटो चांगलाच चर्चेत आला आहे. हा फोटो आदित्य ठाकरे यांनी छत्र हातात घेतल्याचा आहे. हा फोटो महंत सुधीरदास यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी काय म्हटले आहे ते त्यांनी सांगितले आहे. आपण आचार्य श्रीमहंत आहात मी छत्री धरतो म्हणून आपल्या हातात छत्री घेतली एवढ्या राजकीय दगदगीत आदित्य ठाकरेजी यांची विनम्रता भावली.
Shivsena Yuva Sena Chief Aditya Thackeray Nashik visit photo viral