मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बंडखोरीमुळे अडचणीत आलेल्या शिवसेनेने आता एकेक पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे. पक्षांतर्गत कारवाई करतानाच सर्वोच्च न्यायालयात न्यायालीन लढाई केली जात आहे. त्याचबरोबर आता शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र लिहिले आहे.
पक्षाचे सचिव सुभाष देसाई यांनी लिहिलेल्या या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, शिवसेनेन यापूर्वीच १६ बंडखोरांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे पत्र तत्कालिन विधानसभा उपाध्यक्षांना दिले होते. त्यानुसार त्यांनी नोटीस बजावली होती. आता हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत राज्यपलांनी बंडखोर आमदारांपैकी कुणालाही मंत्रिपदाची शपथ देऊ नये, अशी विनंती करण्यात आली आहे. जर तसे झाले तर संवैधानिकदृष्ट्या ही बाब सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी ठरेल, असेही या पत्राद्वारे राज्यपालांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत विधानसभा अध्यक्षांनाही कुठलाही निर्णय घेऊ नये, असे बजावले आहे.
Shivsena wrote letter to Maharashtra Governor