मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. तशी माहिती पक्षाचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे. मातोश्री या निवासस्थानी संध्याकाळी ५ वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. राऊत यांनी सांगितले आहे की, आज अत्यंत ज्वलंत विषयावर उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते काय घोषणा करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सागली जिल्ह्यातील जत तालुक्यावर थेट दावा सांगितला आहे. या तालुक्यातील ४४ गावे आमची असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा फेटाळून लावला. त्यानंतर मुख्यमंत्री बोम्मई यांनी आता थेट फडणवीसांना आव्हान दिले आहे. हे प्रकरण ताजे आहे. तर, सर्वोच्च न्यायालयात हे स्पष्ट झाले आहे की, केंद्रीय निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ ६ वर्षांचा आहे. पण, मोदी सरकारकडून दरवर्षी आयुक्त नेमला जात आहे. ही बाब लोकशाहीला घातक असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र सीमावादासह आणखी कुठल्या विषयावर प्रकाश टाकणार, काही गौप्यस्फोट करणार की काही घोषणा करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/rautsanjay61/status/1595695744937504769?s=20&t=aJbyCsdx8i7b0OAfOh4LSQ
Shivsena Uddhav Thackeray Press Conference Shortly