इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्री या निवासस्थानी गेले. यावेळी त्यांनी शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले. मातोश्रीवर पोहोचल्यावर त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी बाळासाहेब बसायचे त्या विशेष खुर्चीला वंदन करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
या भेटीनंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटले की, माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्याचे म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख म्हटल्यामुळे त्याकडेही सर्वांचे लक्ष वेधले आहे.
काही दिवसांपूर्वी ठाकरे बंधू मराठी मुद्द्यावर एकत्र आले. त्यानंतर हे दोन्ही बंधू एकत्र आले. या भेटीमुळे आता दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहे.