इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिकचे देवाभाऊ हरिभाऊ वाघमारे यांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, उपनेते दत्ता गायकवाड तसेच नाशिकमधील इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
गेल्या काही दिवसात ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठे धक्के बसले असतांना आज पहिल्यांदा ३०० कार्यकर्त्यांसह देवाभाऊ वाघमारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांनी याअगोदर अपक्ष म्हणून नाशिक विधानसभा निवडणूक लढवली होती. पण, त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला.
या प्रवेश सोहळ्याच्या वेळी उध्दव ठाकरे यांनी सांगितले की, एक देवाभाऊ आहेत, त्यांच्याकडे सगळं काही आहे. सत्ता, पद आणि अधिकार…तरीही फोडफोडीचं राजकारण सुरुये..हा एक देवाभाऊ आहे, आपल्याकडे काही नाही लढावं लागेल असे सांगितलं आणि त्यांनी शिवसेनेची साथ दिली. असे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.