मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरुन महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाने आपल्या नेत्यांची तातडीची बैठक सुरु आहे. त्यात २८८ जागा स्वबळावर लढण्याची चर्चा सुरु असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटात अनेक जागांवर तणाव आहे. त्यामुळे ही बैठक घेण्यात आली होती.
या बैठकीत खा. संजय राऊत, विनायक राऊत व सुभाष देसाई यासह प्रमुख नेते उपस्थितीत होते. गेल्या काही दिवसांपासून विदर्भाच्या जागांवर हा तणाव आहे. येथे १२ जागा आहे. त्यावर हा वाद आहे. या बैठकीत उमेदवारांच्या नावाची चर्चा होणार आहे.
शनिवारी १० तास बैठक होऊनही अद्याप जागावाटपावर तोडगा निघालेला नाही. अशातच उध्दव ठाकरेंनी ही बैठक बोलावल्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे.