शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भगवा दरोडेखोरांच्या हातात शोभत नाही…उद्धव ठाकरे यांची भाजप, शिंदे गटावर टीका

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 9, 2024 | 12:12 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
udhava

बुलडाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे निर्माण केले होते. छत्रपती शिवरायांचा जो भगवा झेंडा आहे, तो मावळ्यांच्या हातात शोभतो. दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही. आपल्या पक्षावर दरोडा घातला. चाळीस जणांची टोळी आली दरोडा घालून पक्ष चोरून नेला. आता म्हणत आहेत, की हा पक्ष आमचा आहे. गद्दारच आहेत ते. खोकेबाज आणि धोकेबाज आहेत, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपची पिसे काढली.

जयश्री शेळके यांच्या प्रचारार्थ आज बुलडाण्यात ठाकरे यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजप आणि शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा मावळ्यांच्या हाती शोभून दिसतो दरोडेखोरांच्या नाही. मागच्या वेळी गद्दारांवर विश्वास ठेवला आणि चूक केली त्याबद्दल माफी मागतो. छत्रपती शिवरायांचा झेंडा घेऊन नाचवत आहेत, ते काही सगळेच मावळे नाहीत. गेल्या वेळी आपण चूक केली. मी निवडणुकीच्या प्रचारात फिरतो आहे, तर पाहिले की प्रत्येक ठिकाणी आपल्या विरोधात आपला गद्दार उभा राहिला आहे. साहजिकच आहे ही चूक माझी आहे कारण यांना तिकिट विश्वास ठेवून मी दिले होते. माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्या गद्दारांना निवड़ून दिले होते. आता त्या चुकीची पुनरावृत्ती करणार नाही.

पन्नास खोके आता नॉट ओके. आता यांनी एवढे कमावले आहे, की त्यांना हरवले, तरी काही फरक पडत नाही. एवढे त्यांनी कमावले आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला. ५० खोके तर आता सुट्टे पैसे झाले आहेत, असे ते म्हणाले. भाजपवाल्यांची आणि मोदी यांची आम्हाला कमाल वाटते. चोर-दरोडेखोरांना घेऊन आमच्यावर कसे काय चालून येत आहात? भाजपला कुणी ओळखत नव्हते, तेव्हा आम्ही तुम्हाला साथ दिली. शिवसेना नसती तर मोदीही पंतप्रधान झाले नसते आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री एक नारा देऊन गेले, की बटेंगे तो कटेंगे. कुणाची हिंमत आहे असे करण्याची? आम्हाला काय शिकवत आहात? असा सवाल ठाकरे यांनी केला. माझ्या बरोबर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बारा बलुतेदार सगळे आमच्या पाठिशी आहेत. योगीजी तुमच्या महायुतीकडे बघा. तुमच्या गुलाबी जॅकेटवाले म्हणाले, बाहेरच्या लोकांनी येऊन लुडबूड करू नये. महायुतीत एकवाक्यता नसेल तर तुम्ही आम्हाला कशाला शिकवता? असाही प्रश्न त्यांनी विचारला.

हिंदुत्वाचा भ्रम तुम्ही निर्माण केलात. वर गेल्यानंतर आम्हाला लाथा घालू लागलात? ठीक आहे तुमचे तंगडे धरून तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर भिरकावून दिले नाही, तर मी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय हे बोलणार नाही,’ असा इशारा ठाकरे यांनी दिला.

You may like to read

  • करचुकवेगिरी प्रकरणात ३० कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक…दोन जणांना अटक
  • सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांसंदर्भात दिले हे निर्देश…
  • महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी पाळणाघरे सुरू होणार…मिशन शक्ती अंतर्गत मान्यता
  • जळगावमध्ये ट्रक व दुचाकीच्या भीषण अपघातात कबीर मठातील महंत प्रियरंजनदास जागीच ठार…सतंप्त नागरिकांचा रास्ता रोको
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जैन समाजातील वधुवरांनी साधेपणाने विवाह करून निर्माण केला आदर्श !

Next Post

महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री फडणवीस, शाह यांचे सूतोवाच; शरद पवार यांना केले टार्गेट

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
amit shah11

महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री फडणवीस, शाह यांचे सूतोवाच; शरद पवार यांना केले टार्गेट

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011