मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत ६५ नावांचा समावेश होता. पण, त्यानंतर १ नाव सामना मध्ये वगळण्यात आले होते. या दुस-या यादीत १५ उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत ठाकरे गटाचे ७९ उमेदवार जाहीर झाले आहे.
महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गट ७९, काँग्रेस ४८ व राष्ट्रवादी शरद पवार गटाने ४५ उमेदवारांची यादी आतापर्यंत जाहीर केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे आतापर्यंत १७२ उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. अजून ११६ उमेदवारांची घोषणा बाकी आहे. यात १८ जागा या मित्रपक्षाला देण्यात येणार आहे. महाविकास आघाडीने ९०-९०-९० असा फॅार्म्युला निश्चित केला आहे. त्यात काही जागांची अदलाबदलही केली जाणार आहे. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या ६५ जागांपैकी १२ जागामध्ये शरद पवार गट, काँग्रेस व शेकापने दावा केला आहे.
शिवसेना दुसऱ्या यादीतील उमेदवार –
धुळे शहर- अनिल गोटे
चोपडा (अज) – राजू तडवी
जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन
बुलढाणा- जयश्री शेळके
दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल
हिंगोली- रूपाली राजेश पाटील
परतूर- आसाराम बोराडे
देवळाली (अजा) – योगेश घोलप
कल्याण पश्चिम- सचिन बासरे
कल्याण पूर्व – धनंजय बोडारे
वडाळा – श्रध्दा जाधव
शिवडी – अजय चौधरी
भायखळा – मनोज जामसुतकर
श्रीगोंदा – अनुराधा राजेंद्र नागावडे
कणकवली – संदेश भास्कर पारकर