इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लहान मुलांवर लादण्याचा सरकारचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मराठी माणसाच्या एकजुटीने हाणून पाडला. २९ जून २०२५ ला सरकारने हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर ठाकरे बंधु विजयी मेळावा मुंबईत वरळी डोम सभागृहात साजरा झाला. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार भाषण केले. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने टीका केली आहे.
या मेळाव्यानंतर शिवसेना शिंदे गटाने सोशल मीडियावर टीका केली आहे. यात म्हटले की, एक प्रबोधक, दुसरा प्रक्षोभक…एक उजवा, दुसरा डावा…एक धाकला असून थोरला…दुसरा थोरला असून धाकला…एक मराठी प्रेमी, दुसरा खुर्चीप्रेमी….एकाच्या मुखी आसूड, दुसऱ्याच्या तोंडी सूड!….एक मराठीचा पुरस्कर्ता, दुसरा तिरस्कर्ता…एक प्रगल्भ, दुसरा वेडापिसा…एकाचा मराठीचा वसा, दुसऱा भरतोय खिसा…एकाचा स्वतंत्र सवतासुभा, दुसरा नुसताच आयतोबा!
अशी टीका केली आहे.
अजून शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या नाही.