मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शिंदे गटाने नियुक्त केलेले मुख्य प्रतोद भरत गोगावले यांचा हा व्हिडिओ आहे. त्यात गोगावले यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर प्रथमच अतिशय गंभीर आरोप केला आहे.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सेना आमदारांची उद्धव यांनी साधी बैठक तरी घेतली का, असा खडा सवाल गोगावले यांनी उपस्थित केला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत आमदारांना उपमुख्यमंत्री अजित पवार हे निधी देत होते, असे गोगावले यांनी म्हटले आहे. तसेच, शिवसेनेचे खच्चीकरण करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात पुढे जात होता. या सर्व कठीण परिस्थितीत एकनाथ शिंदे आम्हा सर्व शिवसेना आमदारांना आधार दिला. आम्हा सर्व आमदारांच्या आग्रहाखातरच एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिक आणि शिवसैनिकांच्या हितासाठी ही भूमिका घेतली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
बघा त्यांचा हा व्हिडिओ
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या शिवसेना आमदारांची गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी कधी साधी बैठक तरी घेतली का..?
उलटपक्षी राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांना उपमुख्यमंत्री निधी देत होते, ताकद देत होते. pic.twitter.com/NeLOhTRy42
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 26, 2022
Shivsena Eknath Shinde group allegation first time on Uddhav Thackeray Maharashtra Political Crisis