नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्या १२ खासदारांनी आज तातडीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. तसेच, या सर्वांनी अध्यक्षांना एक पत्र दिले आहे. त्यात काही महत्त्वाच्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी महाराष्ट्र सदनात या १२ खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आहे.
शिवसेनेपासून शिंदे गट वेगळा असून शिवसेनेच्या गटनेते पदी खासदार राहुल शेवाळे यांची नियुक्ती करावी, अशी प्रमुख मागणी त्यात करण्यात आली आहे. आमच्याकडे दोन तृतीयांश खासदारांचा पाठिंबा असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. तसेच, संसदेतील शिवसेनेचे कार्यालयाचा ताबा मिळावा, अशी विनंतीही त्यात करण्यात आली आहे.
https://twitter.com/_prashantkadam/status/1549359792577138691?s=20&t=0_BIVPDNZEO_s5OC8WJA2Q
पक्षाच्या मुख्य प्रतोद पदी भावना गवळी यांची नियुक्ती ठेवण्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटनेते आणि प्रतोद या दोन्ही पदावर अन्य नेत्यांची नियुक्ती केली आहे. आता लोकसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Shivsena Rebel MP Meet Loksabha Speaker Om Birla CM Eknath Shinde Group