इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे हे पहिल्यांदाच विधानसभेत गेले आहेत. कांदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांचा पराभव करुन विधानसभा गाठली. शिवसेनेच्या माध्यमातूनच ते आमदार बनले. त्यांनी बंडखोरी करीत एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांनी असे नक्की का केले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यासंदर्भात आता कांदे यांनीच खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांनीच कांदे यांच्या मनोगताचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. बघा कांदे यांचे नेमके म्हणणे काय आहे याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/mieknathshinde/status/1541723525626863616?s=20&t=uyR9WqMRGwlHwOVg5-XAtQ
Shivsena rebel MLA video shared by Eknath Shinde group Maharashtra Political Crisis