अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नांदगाव विधानसभेचे शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांचे पोस्टर अज्ञाताने फाडले आहे. नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील वसंत तांडा येथे रस्त्यावर उभारलेल्या स्टँडवरील त्यांचे पोस्टर लावले होते. ते फाडण्यात आले आहे. पोस्टरवरील आमदार कांदे यांचे नाव अज्ञात लोकांनी मिटवल्याने आमदार समर्थकांनी या घटनेचा निषेध केला आहे. हा प्रकार कोणीतरी संघर्ष वाढावा म्हणून केला का हे शोधणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांचा शनिवारी नाशिक दौरा आहे. त्यामुळे या घटनेकडे गांभीर्याने बघितले जात आहे. आ. कांदे यांनी नांदगाव विधानसभा मतदार संघात विविध विकास कामे केली आहे. त्यातच त्यांच्या समर्थकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या घटनेची पोस्ट येताच आ. कांदे यांच्या समर्थकांनी निषेध केला आहे.
Shivsena Rebel MLA Suhas Kande Poster Tear in Nandgaon Nashik