पणजी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसे आदेश शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले आहेत. त्याचे पडसाद आता उमटत आहेत. यासंदर्भात शिंदे गट आक्रमक झाला आहे. त्यामुळेच गटाच्यावतीने बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
एकनाथ शिंदे गट सातत्याने शिवसेनेवर आपली सत्ता गाजवत आहे. शिवसेनेतून शिंदे यांची हकालपट्टी करण्यात आली. त्याचे पडसाद गोव्यात बसलेले बंडखोर आमदार आणि शिंदे गटाचे सहकारी संतप्त झाले आहेत. उद्धव ठाकरेंविरोधात बोलणार नाही, पण आमचीही मर्यादा आहे, असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. तेच आमचे नेते आहेत, असा आमचा अजूनही विश्वास आहे. आमच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत पण त्याला मर्यादा आहे. एकनाथ शिंदे यांना पक्षातून हाकलून देणे हे अयोग्य आहे. या निर्णयाला आव्हान दिले जाईल. आम्ही कायदेशीर कारवाईही करु. कारण, या निर्णयाचा लोकशाहीवर परिणाम होणार आहे.”
दरम्यान, शिवसेनेच्यावतीने सध्या सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. त्याबद्दल केसरकर म्हणाले की, “शिवसेना सोडणार नसल्याच्या १०० रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर कार्यकर्ते स्वाक्षरी करत आहेत. शिवबंधन (जेव्हा एखादी व्यक्ती शिवसेनेत येते) हे प्रेमाचे ‘बंधन’ आहे आणि ते आजही आपल्यासोबत आहे. प्रतिज्ञापत्र हे केवळ कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठी आहे. २० रुपयांचा वडापाव विकणारा व्यक्ती कसा सदस्य होईल. आणि कसा तो १०० रुपयांचे प्रतिज्ञापत्र विकत घेईल, असा प्रश्न उपस्थित करुन केसरकर यांनी ठाकरे गटाचे सदस्यत्व अभियान बरोबर नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Shivsena Rebel MLA Shinde Group reaction on Uddhav Thackeray action Politics