इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेत बंडखोरी करीत एकनाथ शिंदे यांचा गट स्वीकारला आहे. सध्या हे सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीच्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये आहेत. मतदारसंघातील एका कार्यकर्त्याने त्यांना मोबाईलद्वारे संपर्क साधला. त्यावेळी शहाजीबापू यांनी अतिशय गंमतीदार पद्धतीने संवाद साधला आहे. काय झाडी…काय डोंगर.. काय हाटेल… सगळं एकदम ओके आहे. हा संवाद सध्या प्रचंड गाजतो आहे. सोशल मिडियात त्याची प्रचंड चर्चा आहे. बंडखोर आमदारांच्या गोटातही त्याची खुमासदार चर्चा सुरू आहे. अशातच शहाजीबापू यांनी त्यांचा हा डायलॉग बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना ऐकवला. बघा त्याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/_prashantkadam/status/1541740578702258176?s=20&t=uyR9WqMRGwlHwOVg5-XAtQ
Shivsena rebel MLA shahaji bapu patil dialogue video Maharashtra Political Crisis