मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सुमारे ५० आमदारांनी बंडखोरी करत गुवाहाटी गाठली होती. त्यावेळी त्या आमदारांची राज्यभर चर्चा सुरू होती, त्यात सर्वाधिक चर्चा झाली ती सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या डायलॉगबाजीची, हा डायलॉग इतका गाजला की सोशल मीडियावरच नव्हे तर अबाल वृद्धांपर्यंत आजही वेगवेगळ्या पद्धतीने म्हटले जात आहे. या डायलॉग बाजीचा प्रत्यय पुन्हा एकदा टीव्ही मधील एका कार्यक्रमात आला.
तेव्हा शिवसेनेतील बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांचा आपल्या कार्यकर्त्याशी फोनवरुन झालेला संवाद तुफान व्हायरल झाला होता. गुवाहाटीत असताना त्यांनी रफीक नावाच्या त्यांच्या माजी नगराध्यक्ष असलेल्या मित्राला केलेल्या संभाषणातील काय झाडी, काय डोंगार, काय हाटील… हे वाक्य तुफान गाजले, अनेकांनी या डायलॉगवरुन मिम्स आणि गाणीही वाजवली. तर, १५ दिवसांनी त्यांनी मतदारसंघात पाय ठेवले. त्यावेळी, त्यांच्या पत्नी रेखा यांनी देखील औक्षण करुन त्यांचे स्वागत केले. तर, काय झाडी, काय डोंगार, काय हाटील… समदं ओक्के, शिंदेसाहेब मुख्यमंत्री ओक्के… असा डायलॉगही मारला. तर उपस्थितांच्या आग्रहास्तव उखाणाही घेतला होता.
आमदार शहाजी बापू पाटीलांसाठी चला हवा येऊ द्या च्या सेटवर सादर झालं एक धमाल गाणं.
@ShahajibapuP1
सोम-मंगळ. रात्री ९.३० वा. #BhauchaPangaAmeriketDanga#ChalaHawaYeuDya #CHYD#SwwapnilJoshi #ZeeMarathi pic.twitter.com/0OkcW4wUm5
— Zee Marathi (@zeemarathi) July 14, 2022
आता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही गुवाहाटीचे किस्से सांगताना शहाजीबापू पाटलांच्या ओक्केची आठवण करुन देतात. याच शहाजीबापूंनी नुकतेच ‘चला हवा येऊ द्या ‘ कार्यक्रमात हजेरी लावत त्यामध्ये, त्यांनी पत्नीसाठी खास दुष्काळी उखाणाही घेतला आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात काही पॉलिटीकल जोड्यांची एंट्री पाहायला मिळाली. त्यात, सांगोल्याचे आमदार आणि शिवसेनेतील बंडखोर नेते शहाजीबापू पाटील हेही त्यांच्या पत्नीसमवेत दिसून आले.
या कार्यक्रमात अभिनेता भाऊ कदमने त्यांचा काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील… एकदम ओक्के असा डायलॉग मारला. तर, शहाजीबापूंनीही काय चला हवा येऊ द्या, काय भाऊ कदम, काय डॉक्टरसाहेब… असे म्हणत पुन्हा एकदा गुवाहाटीची आठवण करुन दिली. या एपिसोडमध्ये शहाजीबापूंसोबत त्यांच्या पत्नी रेखा याही हजर होत्या. यावेळी, अभिनेता व अँकर निलेश साबळे व उपस्थितांच्या आग्रहास्तव शहाजीबापूंनी पत्नीसाठी उखाणाही घेतला.
सगळंच ओक्के एकदम!
सोम-मंग. रात्री ९.३० वा. #BhauchaPangaAmeriketDanga#ChalaHawaYeuDya #CHYD#SwwapnilJoshi #ZeeMarathi
आता तुमची आवडती मालिका कधीही कुठेही पाहण्यासाठी https://t.co/9q8IXyfdUG या लिंकवर क्लिक करा. pic.twitter.com/NyZUy0oI5S
— Zee Marathi (@zeemarathi) July 17, 2022
माझ्या दुष्काळी तालुक्याला पाणी पुरवणाऱ्या नदीचे नाव आहे माण, रेखा माझी जान… असा दुष्काळी भागाची व्यथा मांडणार उखाणा शहाजीबापूंनी घेतला. या उखाण्याला अनेकांना दादही दिली. दरम्यान, चला हवा येऊ द्याच्या याच भागात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील याही त्यांच्या जोडीदारासमवेत हजर होत्या.
त्याचप्रमाणे रेखाताईंनीही उखाणा घेतला, ‘ आशील तिथं मुलीने नम्रतेने वागावे, शहाजी बापूंसारखा पती मिळाल्यावर देवाकडे आणखी काय मागावे… ‘असा उखाणाही घेतला. तर, अगोदरची परिस्थिती हालाखीचीच होती, अशी आठवणही सांगितली. तसेच आमदार शहाजी बापू पाटील यांना काही आठवणींना उजाळा दिला.
आमदार शहाजी बापू पाटीला यांची रील पण आहे ओक्के एकदम.
सोम-मंग. रात्री ९.३० वा. #BhauchaPangaAmeriketDanga#ChalaHawaYeuDya #CHYD#SwwapnilJoshi #ZeeMarathi
आता तुमची आवडती मालिका कधीही कुठेही पाहण्यासाठी https://t.co/9q8IXxXD38 या लिंकवर क्लिक करा. pic.twitter.com/1qdajC1Byq
— Zee Marathi (@zeemarathi) July 17, 2022
Shivsena Rebel MLA Shahaji Bapu Patil And his Wife Rekha Ukhana