मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी अखेर त्यांच्या गटाचे नाव निश्चित केले आहे. आतापर्यंत हळूहळू चाल खेळणाऱ्या शिंदे गटाने आता एकेक पावले पुढे टाकायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या गटाचे नाव त्यांनी निश्चित केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या गटाचे नाव ”शिवसेना-बाळासाहेब ठाकरे” असे राहणार आहे.
शिंदे समर्थक आमदारांची आज गुवाहाटीतील हॉटेलमध्ये बैठक होत आहे. या बैठकीत या नावावर शिक्कामोर्तब होणार असून त्याची घोषणा आज सायंकाळीच केली जाणार आहे. सद्यस्थितीत शिंदे गटाच्या तंबूमध्ये ४० पेक्षा अधिक बंडखोर आमदार आहेत. त्यात कॅबिनेट आणि राज्य मंत्र्यांचाही समावेश आहे.
शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करण्याचा कुठलाही अधिकारी नसल्याची प्रतिक्रीया शिवसेनेच्या नेत्यांनी दिली आहे. बाळासाहेबांचे नाव वापरुन केवळ त्यांना सहानुभूती मिळवायची आहे. प्रत्यक्षात त्यांनी शिवसेनेत गद्दारी केली आहे. बाळासाहेब ठाकरे सुद्धा हे सर्व पहात असून ते सुद्धा त्यांना माफ करणार नाहीत, असे शिवसेना नेत्यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/ANI/status/1540605303666135040?s=20&t=KcDnj2Dpfzffk3eDGcHHDg
shivsena rebel mla group name is fixed maharashtra political crisis