इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या आणि बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणाऱ्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या जवळपास सर्व बैठकांना उपस्थित राहिलेले उदय सामंत हे अचानक गुवाहाटीत दाखल झाले. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. उदय सामंत हे स्वतःहून गेले की त्यांना पाठविण्यात आले अशी शंका अनेकांना आहे. यासंदर्भात आज खुलासा झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी सामंत यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. शिंदे गटात ते सहभागी का झाले हे सांगणारा सामंत यांचा हा व्हिडिओ आहे. बघा ते काय म्हणताय याचे हे दोन व्हिडिओ
https://twitter.com/mieknathshinde/status/1541689703703130112?s=20&t=uyR9WqMRGwlHwOVg5-XAtQ
https://twitter.com/mieknathshinde/status/1541712351086641152?s=20&t=uyR9WqMRGwlHwOVg5-XAtQ
Shivsena rebel minister Uday Samant video Maharashtra Political Crisis