शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भाजपला नकोय शिंदे गटातील हा नेता; शिंदेचा त्रास आणि कोंडी वाढणार

by India Darpan
सप्टेंबर 16, 2022 | 5:21 am
in संमिश्र वार्ता
0
Fadanvis Shinde

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेत मोठी फूट पाडल्यानंतर भाजपसोबत संसार थाटणाऱ्या एकनाथ शिंदे यांची हळूहळू कोंडी होत आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर विविध घडामोडींना, राजकारणाला वेग आला आहे. त्यातच आता शिंदे गटातील मुंबईचा एक नेता भाजपला नको असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिंदे गटाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्रास आणि कोंडी वाढणार आहे.

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती यशवंत जाधव यांच्यावर अनेक आरोप यापूर्वी झाले आहेत. त्यांच्या पत्नी तथा आमदार यामिनी जाधव या सध्या शिंदे गटात आहेत. जाधव दाम्पत्य शिंदे गटात असले तरी सध्या भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. कारण, जाधव यांच्या भ्रष्टाचाराची आता शुद्धी झाली का? असा प्रश्न मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट केले की, यशवंत जाधव आपल्याला नकोच आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आता नेमकी काय भूमिका घेतात याकडे सध्याचे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

शेलार म्हणाले की, मुंबई महापालिकेत भाजप हा शिंदे गटासोबत १५०चा आकडा पार करेल. यानंतर आम्ही महापालिकेत ‘सेवालय’ सुरू करू. आतापर्यंत कंत्राटदारांचे केवळ ‘वसुलीआलय’ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सुरू होते. आम्ही भाजप आणि शिवसेना मिळून खऱ्या अर्थाने सेवालय सुरू करू. तसेच, या ‘सेवालया’च्या दरवाजात यशवंत जाधवांसारख्या प्रवृत्तीचा एकही माणूस नसेल, असे शेलार यांनी म्हटल्याने शिंदे यांची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांना ‘इकडे आड तिकडे विहीर’ असा प्रकार सध्या झाला आहे. भाजपचा हात धरावा तर आपल्या सोबतचे एक एक मंत्री पुन्हा बाहेर पडू शकता,त कारण आधीच अपक्ष आमदार बच्चू कडू असो की औरंगाबादचे संजय शिरसाठ असो मंत्री पदाप्रकरणावरून वारंवार उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यातच आता हे जाधव प्रकरण दूध भरले आहे त्यामुळे आमदारांना सांभाळावे तर भाजपचा हात सुटतो अशी एकनाथ शिंदे यांची परिस्थिती झाल्याचे बोलले जात आहे.

मुंबई महापालिकेच्या ३० कोटींच्या वेगवेगळ्या कंत्राटांसाठी यशवंत जाधव यांनी विमल अग्रवाल यांची बाजू घेतल्याचा संशय आहे. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव ज्या भायखळ्याच्या आमदार आहेत त्यांनी २०१९ ला प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. यातूनच प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कोलकाता येथील या कंपनीशी व्यवहाराची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली. कंपनीने जवळपास १५ कोटी रुपये दिले होते. या पैशातून जाधव आणि त्यांच्या कुटुंबाने भायखळ्यातील एका इमारतीच्या खरेदीसाठी हे पैसे गुंतवले होते

शेलार यांना पत्रकारांनी विचारले की, आपण ठाकरेंच्या शिवसेनेने मुबई महानगर पालिकेत केलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात बोलत आहात. तसेच, आमच्याकडे मुंबई महानगर पालिकेची सत्ता आल्यानंतर आम्ही ‘सेवालय’ सुरू करू, असे म्हणत आहात, तर मग या सेवालयात यशवंत जाधव नेमके कोणत्या भूमिकेत असतील? असे विचारले असता शेलार म्हणाले, ते (यशवंत जाधव) शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. आम्ही प्रवृत्तीच्या विरोधातील लढाई लढत आहोत. यशवंत जाधवांसारख्या प्रवृत्तीचा एकही माणून ‘सेवालया’च्या दरवाजात नसेल, असे शेलार यांनी स्पष्ट केले.

यशवंत जाधव हे शिवसेनेचे उपनेते होते. मात्र, शिवसेना पक्षात बंडखोरी करत ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. तत्पूर्वी, सामान्य कार्यकर्ता म्हणून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या यशवंत जाधव यांनी गेल्या दोन दशकांमध्ये महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सलग चारवेळा त्यांना अध्यक्षपद देण्यात आले होते. २०१७ मध्ये यशवंत जाधव हे तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यामुळे शिवसेना पक्षाने त्यांच्यावर सभागृह नेतेपद सोपविले. त्यानंतर २०१८ पासून सलग चार वर्षे ते स्थायी समिती अध्यक्ष होते.

भाजपतील काही नेत्यांनी यशवंत जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यानंतर केंद्रीय आयकर विभागाने त्यांच्या घरावर धाड टाकली होती. त्यांच्या जवळपास ५३ मालमत्ता आयकर विभागाने जप्तही केल्या होत्या. यात भायखळा येथील फ्लॅट्स, हॉटेल आणि वांद्र्यातील एका फ्लॅटचाही समावेश होता. प्राप्तीकर विभागाने फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस यशवंत जाधव यांच्या घरासह इतर मालमत्तांवर छापेमारी सुरू केली होती. काही दिवस ही कारवाई सुरू होती. त्यानंतर आता जवळपास दीड महिन्याने विभागाने जाधव यांच्याकडील अनेक मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे.

यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छापेमारीत अधिकाऱ्यांनी केलेल्या छापेमारीत 2 कोटी रुपयांची रोकड, लॅपटॉप आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवज जप्त करण्यात आले होते. त्याचबरोबर तब्बल दोन दिवस चाललेल्या चौकशीत मोठे पुरावे प्राप्तकर विभागाच्या हाती लागले होते. या चौकशीनंतर यशवंत जाधव यांच्यावर आता ED ची वक्रदृष्टी पडली होती. यशवंत जाधव यांनी विदेशात केलेली गुंतवणूक, त्यांच्या एकूण मालमत्तेची ED कडून चौकशी करण्यात आली होती.

भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गेल्या जानेवारीमध्ये यशवंत जाधव यांनी कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता. भाजपने यशवंत जाधवांवर मनी लॉन्ड्रिंगचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर यशवंत जाधव यांच्या मुंबईतील घरावर प्राप्तीकर विभागाने छापेमारी केली होती. या कारवाईत मोठं गबाड हाती लागले होते. यशवंत जाधव यांच्याशी संबंधित तब्बल 53 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. भायखळ्यातील 31 फ्लॅट्स आणि वांद्रे येथील 5 कोटींचा फ्लॅट प्राप्तीकर विभागाकडून जप्त करण्यात आला होता.

Shivsena Rebel Group BJP Leaders Eknath Shinde Politics

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आरोग्य टीप्स: जास्वंद चहा पिण्याचे आहेत हे सारे फायदे

Next Post

नवाब मलिकांच्या अडचणीत प्रचंड वाढ; ईडीने केला हा गंभीर दावा

Next Post
संग्रहित फोटो

नवाब मलिकांच्या अडचणीत प्रचंड वाढ; ईडीने केला हा गंभीर दावा

ताज्या बातम्या

Hon CM @ Metro 3 phase opening 2 1024x953 1 e1746811674674

मुंबई मेट्रो लाईन-३ सेवेचा विस्तार शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…

मे 9, 2025
IMG 20250509 WA0079 1024x683 1

पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले जाईल…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मे 9, 2025
Untitled 21

आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा, त्यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा आणि दूरदृष्टीचा अभिमान…लोकसभा अध्यक्ष

मे 9, 2025
crime 13

घरात पाय घसरून पडल्याने ८० वर्षीय वृध्दाचा मृत्यू

मे 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अर्थकारण सुधारणार, जाणून घ्या, शनिवार, १० मेचे राशिभविष्य

मे 9, 2025
IMG 20250509 WA0290 1

नाशिक येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011