मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेतून बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे यांचा समर्थक आमदारांसमोरचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात हे स्पष्ट झाले आहे की, एकनाथ शिंदे यांनी ठोस निर्णय घेतला आहे. आतापर्यंत शिंदे यांची भूमिका गुलदस्त्यात राहिली आहे. मात्र, शिंदे यांनी आता त्यांची आगामी राजकारण आणि निर्णयांची दिशा स्पष्ट केली आहे.
एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षाचा संपूर्णपणे पाठिंबा आहे. तशी माहिती शिंदे यांनीच दिली आहे. या व्हिडिओत दिसते आहे की, सर्व आमदारांनी शिंदे यांना त्यांचे गटनेते म्हणून मान्यता दिली आहे. त्यानंतर शिंदे हे समर्थक आमदारांना मार्गदर्शन करीत आहेत. त्ात ते सांगतात की, आपला एकजुटीने विजय होईल. तुम्ही जे म्हणालात ती नॅशनल पार्टी आहे. ती महाशक्ती आहे. त्यांनी पाकिस्तानला धूळ चारली आहे. काय परिस्थिती होती माहित नाही. पण, त्यांनी मला सांगितलं आहे की, तुम्ही जो निर्णय घेतलला आहे…..
एवढंच शिंदे बोलत आहेत. त्यांचा हा सर्व रोख भाजपकडे जात आहे.
बघा त्यांचा हा व्हिडिओ
https://twitter.com/ANI/status/1539971748757917698?s=20&t=M1_zQ3GyE78vcvybT4n3Ug
shivsena rebel eknath shinde video next journey indication Maharashtra Political crisis