मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात झपाट्याने बदलणाऱ्या राजकीय घडामोडी सातत्याने मनोरंजक वळणे घेत आहेत. एकीकडे उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर कडक कारवाईची घोषणा केली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि बंडखोर गट हे झुकायला तयार नाही. शिंदे आणि फडणवीस यांच्यातही भेट झाल्याचे वृत्त आहे. सध्याच्या परिस्थितीत एकनाथ शिंदे काय करू शकतात, याचे सर्वांनाच औत्सुक्य आहे. इथून पुढे शिंदे यांच्याकडे एकूण ५ पर्याय आहेत. ते कोणते ते जाणून घेऊया…
बंडखोर आमदार अपात्र ठरले तर
विधानसभा उपसभापतींनी १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या बुधवारी पक्षाची बैठक बोलवली होती. त्यास हे आमदार सहभागी झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. बंडखोर गटनेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व १६ आमदारांना अपात्र ठरवल्यास ते काहीही करू शकणार नाही. खुद्द शिंदे यांनाही त्यांचे आमदारपद गमवावे लागणार आहे. ते कोर्टात जाऊ शकत असले तरी ती एक दीर्घ प्रक्रिया असेल.
अविश्वास प्रस्तावासाठी राज्यपालांना पत्र
एकनाथ शिंदे यांच्यासमोर दुसरा पर्याय म्हणजे ते राज्यपालांना अविश्वास ठरावासाठी पत्र लिहू शकतात. मात्र, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार यात अडथळा आहे. पक्षांतरविरोधी कायद्यानुसार शिंदे गटाला शिवसेनेच्या दोन तृतीयांश आमदारांसह अन्य पक्षात प्रवेश करावा लागणार आहे.
भाजपमध्ये विलीन होणे किंवा
शिवसेनेच्या बंडखोर गटाला भाजपमध्ये विलीन करण्याचा दुसरा मार्ग आहे. मात्र, यात मोठी अडचण असून या आमदारांचे राजकीय भवितव्य पणाला लागू शकते. या बंडखोरांनी भाजपमध्ये प्रवेश करताच बाळासाहेब ठाकरेंच्या तत्त्वांपासून त्यांना दूर जावे लागणार आहे. राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी हे योग्य पाऊल ठरणार नाही. त्यामुळे हे सर्व बंडखोर आमदार प्रहार जनशक्ती पक्षात सामील होऊ शकतात. या पक्षाचे आमदार बच्चू कडू सध्या बंडखोरांमध्ये आहेत.
सेनेचे उत्तराधिकारी
शिंदे गटाचे आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेचे उत्तराधिकारी हिसकावून घेऊ शकतील की नाही याची आणखी एक शक्यता आहे. यासाठी त्यांना निवडणूक आयोगाकडे जाऊन शिवसेनेच्या चिन्हावर दावा करावा लागेल. मात्र, पक्षाची घटना ही परवानगी देत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर तळागाळातील नेत्यांचाही पाठिंबा उद्धव यांना असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
ठाकरेंसोबत करार
हा एक शेवटचा पर्याय आहे, ज्याची सध्याच्या परिस्थितीत दूर दूरपणे शक्यता दिसत नाही. दोन्ही गटांनी ज्या प्रकारे एकमेकांच्या विरोधात आघाडी उघडली आहे, त्यावरून दोघांमध्ये काही समझोता होईल, असे कुठेही दिसत नाही. राजकारणात शक्यता अनंत असल्या तरी अंतिम निर्णय होईपर्यंत काहीही सांगता येणार नाही.
shivsena rebel eknath shinde 5 options in near future maharashtra political crisis