नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या एका मोठा निर्णयामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या अडचणी प्रचंड वाढणार आहेत. आपल्याच गटाला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मोठे समर्थन असल्याचे सिद्ध करण्यासाठी ठाकरे गटाने मोठ्या संख्येने प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. आणि यातील तब्बल अडीच लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने बाद ठरविल्याची बाब समोर आली आहे.
चार महिन्यांपूर्वी शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर शिवसेना कुणाची, शिवसेनेचे चिन्ह असलेले धनुष्यबाण कुणाचे हा वाद उदभवला. त्यामुळेच शिंदे आणि ठाकरे गटात मोठा संघर्ष सुरू आहे. अखेर हा वाद निवडणूक आयोगात गेला आहे. अखेर निवडणूक आयोगाकडून चिन्हासह शिवसेना हे नाव देखील गोठवण्यात आले आहे. त्यामुळे आता पुढील आदेश येईपर्यंत दोन्ही गटाला शिवसेना हे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाहीय. चुकीच्या पद्धतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आल्याचे म्हणजेच विहित नमुन्यात दिलेले प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेली नसल्याचे आयोगाने सांगितले आहे. त्यामुळेच अडीत लाख प्रतिज्ञापत्र बाद ठरली आहेत.
ठाकरे गटाने एकूण ११ लाख प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली. त्यातील आता अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद ठरली आहेत. उर्वरीत साडेआठ लाख प्रतिज्ञापत्र ही वैध आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
Shivsena Politics Uddhav Thackeray Election Commission
Affidavit