मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे गटाने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह मिळत नाही तोच विधीमंडळाच्या कार्यालयाचा ताबा घेतला. त्यानंतर लवकरच होऊ घातलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी व्हिप काढणार असल्याची घोषणा शिंदे गटाने केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट व्हिप पाळणार की नाही, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. तसेच दोन्ही बाजून कायद्यांचा आधार स्वत:ची बाजू मांडण्यात येत आहे.
शिवसेनेच्या सर्व ५६ आमदारांनी सभागृहात उपस्थित राहावे असे वक्तव्य आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे. प्रतोद भरत गोगावले त्याबाबतचा व्हिप जारी करणार आहेत. जे उपस्थित राहणार नाहीत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा सरनाईक यांनी दिला आहे. शिवसेनेच्या या ५६ आमदारांमध्ये ठाकरे गटाच्या आमदारांचाही समावेश आहे. दुसरीकडे संजय राऊतांवरही अपात्रतेची कारवाई केली जाणार असल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे. याबाबत संजय शिरसाट यांनी वक्तव्य केले आहे. यासाठी आज बैठक घेण्यात आली होती.
विधीज्ञ श्रीहरी अणे म्हणतात..
शिंदे गटाला ठाकरे गटातील आमदारांसाठी व्हिप वापरता येणार नाही, असे कायदेतज्ज्ञ श्रीहरी अणे यांनी म्हटले आहे. काही वेळापूर्वी उद्धव ठाकरेंनी देखील असेच वक्तव्य केले आहे. शिवसेना शिंदे गटाची किंवा शिवसेना ठाकरे गटाची गोष्टी आहेत. हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत, असे निवडणूक आयोगाने स्वत:च म्हटलेले आहे. यामुळे मुख्य पक्ष जरी शिंदेंचा असला तरी शिवसेना हा सत्ताधारी नाही. यामुळे भाजपा जसा इतर पक्षांवर व्हिप लावू शकत नाही तसेच इथेही आहे. यामुळे शिंदे गट व्हिप जारी करू शकत नाही, असे अणे यांनी म्हटले आहे.
शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांची पत्रकार परिषद
?शिवसेनाभवन – LIVE#UddhavThackeray #शिवसेनाभवन #आपलीशिवसेना #PC
[ MONDAY – 20 FEBRUARY 2023 ] https://t.co/Erb6AfhqmI
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) February 20, 2023
Shivsena Politics Shinde Group Whip MLA Threat