नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगावच्या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार सुहास कांदे यांच्यावर केलेल्या टीकेला सुहास कांदे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. खोक्यांच्या आरोपाबाबत माझ्यासह उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करा. सत्य काय समोर येईल… उलट विविध कंपन्यांकडून आणि कंत्राटदारांकडून मातोश्रीवर खोके गेल्याचे समोर येईल, असे खुले आव्हान आमदार कांदे यांनी दिले आहे.
ठाकरे यांची मालेगावातील कालची सभा फक्त टक्के टोमणे देणारी सभा होती. त्यात फार काहीही नाही. जनतेला सर्व काही माहित आहे. बाळासाहेबांचे विचार आमच्यासाठी सर्वस्व आहे. त्याच्याशी आम्ही कदापिही प्रतारणा करणार नाही, असे कांदे यांनी स्पष्ट केले आहे.
आमदार कांदे यांच्या प्रतिक्रीयेचा बघा हा व्हिडिओ
Shivsena Open Challenge Uddhav Thackeray Narco Test Politics