मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेची बैठक आज झाली. त्यास विविध नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महत्त्वाचे ठराव करण्यात आले आहेत. ते खालीलप्रमाणे
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षाचे प्रमुख असतील. त्यांचे पद हे मुख्य नेता हे असे असेल. सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
– स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा
– पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांसाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना
– शिवसेनेच्या आगामी संघटनात्मक वाटचालीसाठी शिस्तबद्ध समितीची स्थापना. या समितीच्या अध्यक्षपदी मंत्री दादा भुसे तर सदस्यपदी मंत्री शंभूराज देसाई आणि संजय मोरे यांची निवड
– पक्षाचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना असणार
– मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा
– ८० टक्के भूमिपुत्रांना नोकरी देणे
– महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आगामी काळात पक्षाची वाटचाल कशी असेल याबद्दल चर्चा
– राज्य सरकारच्या आठ महिन्यांच्या कामाची नोंद बैठकीत घेण्यात आली.
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामांवरुन त्यांच्या अभिनंदनाचा ठराव
– वीर माता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, छत्रपती संभाजी महाराज यांची नावे राष्ट्रीय पुरुषांच्या यादीत घेणे
– गड-किल्ल्यांचं संवर्धन व्हावे यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेणे
– चर्चगेट रेल्वे स्थानकाला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांचं नाव देणे
– स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मराठी मुलांना पाठिंबा देणे
Shivsena National Committee Meeting Imp Decisions