नवीन नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गुरुवारी नवीन नाशिक मधील माणिक लॉन्स येथे शिवसेना आणि अंगीकृत संघटनांच्या नाशिक महानगरातील पदाधिकाऱ्यांसाठी शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी मिसळ पार्टीचे आयोजन आयोजन केले होते. या मिसळ पार्टीला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे. माजी खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री बबनराव घोलप, शिवसेना उपनेते विजय करंजकर, सह संपर्क प्रमुख राजू अण्णा लवटे, गणेश कदम, सुनील पाटील, जिल्हा संघटक योगेश म्हस्के, माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, अमोल जाधव, श्यामकुमार साबळे, मामा ठाकरे, आर डी धोंगडे, श्रावण पवार, मंदाकिनी जाधव, वैशालीताई दाणी. युवती सेना जिल्हा प्रमुख हर्षदा गायकर, शहर प्रमुख कोमल साळवे, युवासेना विस्तारक योगेश बेलदार, युवासेना जिल्हा प्रमुख रुपेश पालकर, अंबादास जाधव, सदानंद नवले, युवासेना महानगर प्रमुख दिगंबर नाडे, वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे, विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख किरण फडोळ, महानगर प्रमुख शुभम पाटील, शिवाजी भोर यांच्यासह शिवसेना आणि अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी महायुती सरकारने महिला, वृद्ध, युवक, युवतींसाठी सुरु केलेल्या योजनांचा लाभ तळागाळात पोहचविण्यासाठी सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी नवीन नाशिक येथे आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मिसळ ना. दादा भुसे बोलत होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत बँक खात्यावर तीन हजार रुपये जमा झालेल्या महिलांनी यावेळी ना. दादा भुसे आणि प्रविण (बंटी) तिदमे यांना राख्या बांधून आभार मानले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रमाणे सर्वत्र रुजविण्यासाठी आणि शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने जनमाणसासाठी राबविलेल्या योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी शिवसैनिकांनी सतत प्रयत्नशील रहावे असे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी मिसळ पार्टीत केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत बँक खात्यावर तीन हजार रुपये जमा झालेल्या महिलांनी यावेळी दादा भुसे आणि प्रविण (बंटी) तिदमे यांना राख्या बांधून महायुती सरकारचे आभार मानले. मिसळ पार्टी यशस्वीतेसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.