मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जर काही चुकीची केलेले नाही तर मग ते मुंबई पोलिसांसमोर हजर का होत नाहीत, असा खडा सवाल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज सकाळीच राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सोमय्यांवर पुन्हा आगपाखड केली आहे. तसेच, यापुढील काळातही सोमय्या आणि भाजप पुरस्कृत माफिया टोळीचा पर्दाफाश करतच राहणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
राऊत म्हणाले की, काहीही गैर न केल्याचे सांगणार गायब का आहेत. INS विक्रांत अखेर भंगारात गेलीच. विक्रांत वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी 58 कोटी जमा केले. ते कोठे गेले? हाच प्रश्न न्यायालयाला देखील पडला व त्यांनी सोमय्यांचा जामीन अर्ज फेटाळला. यात कसले आले राजकारण? गम्मत इतकीच की विक्रांत निधीचा अपहार करणाऱ्याच्या मागे भाजपा मजबुतीने उभी आहे, असा थेट आरोप राऊत यांनी केला आहे.
राऊत पुढे म्हणाले की, किरीट सोमय्या 140 कोटी रुपये जमा करून राजभवनात देणार होते. त्यांना 58 कोटी जमवता आले. आयएनएस विक्रांत कोटी रुपयांना भंगारात विकली गेली. 58 कोटीचा हिशेब लागत नाही. जे सोमय्या बाप बेट्याने जमा केले. हिशोब तर द्यावाच लागेल. 58 कोटी हडप केले नसते तर विक्रांत वाचवता आली असती, असेही राऊत यांनी सांगितले.
https://twitter.com/rautsanjay61/status/1513568717749190657?s=20&t=ot_vhi4QhssZNoW6Txmp-Q