नाशिक – शिवसेनेचा मुख्यमंत्री पाच वर्षे राहिल. कोणताही वाटा किंवा घाटा नाही अशा स्पष्ट शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. ते म्हणाले की लोकांच्या मनात संभ्रम असू नये म्हणून याबाबत भूमिका सामनामधून स्पष्ट केली. राज्यातील तीनही पक्षात चांगला समन्वय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
उत्तर महाराष्ट्राच्या दौ-यानिमित्त नाशिकमध्ये खासदार राऊत यांनी पत्रकार परिषद घेत विविध प्रश्नांना उत्तर दिले. ते म्हणाले की,संघटनेला गती मिळावी म्हणून हा दौरा होता. मुंबई, कोकणबरोबरच नाशिकसह उत्तर महाराष्ट्राचे संघटनेत मोठे योगदान आहे. त्यामुळे संघटनेला बळ देण्यासाठी हा दौरा केल्याचे ते म्हणाले. संघटनेत कोणतेही बदल आता नसल्याचेही त्यांना यावेळी सांगितले.
यावेळी त्यांनी पत्रकारांना विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर दिली. सत्तेत असतांना भाजपच्या वागणूकीच्या प्रश्नांवर भूमिका स्पष्ट करतांना त्यांनी सांगितले की, मी जळगावच्या मेळाव्यात भाजपने शिवसेनेला दुय्यम वागणूक दिली असे मी म्हणालो. शिवसेनेला स्वाभिमान महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर दिले.
पत्रकार परिदेत काय म्हणाले खा. राऊत हे पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा….
https://fb.watch/65tsMsVk1N/