नाशिक – शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे मास्क का वापरत नाहीत याचा खुलासा त्यांनी स्वतःच केला आहे. नाशिक दौऱ्यावर असताना राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला की, आपण मास्क का वपरत नाहीत तेव्हा राऊत म्हणाले की, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनुकरण करतो. मोदी मास्क घालत नाहीत म्हणून आम्हीही मास्क घालत नाहीत. मोदी सर्वांना आवाहन करतात आणि स्वतःच घालत नाहीत, असे म्हणत राऊत यांनी पंतप्रधानांनाच टोला लगावला आहे. बघा, राऊत काय म्हणाले त्याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/ANI/status/1476597272565538819?s=20