मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर विविध आरोप करणारे आणि त्यांच्याविरुद्ध विविध तपास यंत्रणांकडे तक्रार देणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर अखेर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बॉम्ब टाकला आहे. राऊत यांनी सोमय्या यांना आता थेट भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील घोटाळ्याचे आव्हान दिले आहे. या महापालिकेत तब्बल ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून याप्रकरणी सोमय्या यांनी संक्तवसुली संचालनालयासह अन्य तपास यंत्रणांकडे या घोटाळ्याची तक्रार करावी, असे राऊत यांनी म्हटले आहे. यासंदर्भात राऊत यांनी खुद्द सोमय्या यांनाच पत्र दिले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्मार्ट सिटीची कामे ही बोगस कंपनीला दिली आहे. सर्वसामान्यांच्या पैशांचा हा घोटाळा मोठा असून त्याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, असे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. राऊत यांनी दिलेले पत्र असे