मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती जप्त केल्यानंतर राऊत यांनी अतिशय आक्रमकपणे प्रतिक्रीया दिली आहे. राऊत यांनी ट्विटरवर एक सुविचार पोस्ट केला आहे. जय महाराष्ट्र नावाचा हा सुविचार तुफान व्हायरल झाला आहे. तुम मुझे कब तक रोकोगे असे खुले आव्हानच राऊत यांनी भाजपला दिल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे.
https://twitter.com/rautsanjay61/status/1511329052086267909?s=20&t=_AsK9PnvQUgpIRvJ-TbO8g
मनी लॉँड्रिंग आणि पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने राऊत यांचे अलिबाग मधील काही प्लॉटस आणि दादर येथील फ्लॅट जप्त केला आहे. त्यानंतर त्याचे मोठे पडसाद राज्यात उमटले आहेत. ही कारवाई सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. तर, मी कुठलेही चुकीचे काम केलेले नाही, त्यामुळे मी घाबरणार नाही. खोटे पुरावे आणि खोट्या केसेसचा सिलसिला सुरू झाला आहे. माझ्यावरचे आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेन असे राऊत यांनी आव्हान दिले आहे. मी खरा शिवसैनिक आहे. ईडी ही भाडोत्री झाली आहे. भाजपच्या या खोटेपणाला बिल्कुल घाबरणार नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.