मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राऊत यांच्या विरोधात शिवडी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. यासंदर्भात आता २४ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीतच पुढील निर्णय होणार आहे. म्हणजेच राऊत यांना अटक होईल की नाही हे २४ जानेवारीलाच स्पष्ट होणार आहे.
भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीच्या दाव्यासंदर्भात शिवडी न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकामध्ये संजय राऊत यांनी अग्रलेख लिहिला होता. त्यात त्यांनी आरोप केला होती की, शौचालय घोटाळा झाला. १०० कोटींच्या या घोटाळ्यात सोमय्या यांचे नाव घेण्यात आले. त्यामुळे आपली बदनामी झाल्याचे सांगत मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्यावर मानहानीचा दावा केला आहे. त्याप्रकरणी आता न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे.
Shivsena MP Sanjay Raut Non Bailable Warrant