मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची १०३ दिवसानंतर तुरुंगातून सुटका झाल्याने शिवसैनिकांकडून प्रचंड जल्लोष करण्यात आला. परंतु त्यांच्या अडचणी मात्र अद्यापही कमी झालेले नाहीत, किंबहुना त्या वाढणार असल्याची शक्यता दिसून येत आहेत. कारण ईडीकडून संजय राऊत यांच्या जामिनाला विरोध करणारी सुधारीत याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. ईडीने दाखल केलेल्या सुधारित याचिकेवर दि. २५ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
विशेष म्हणजे ईडीने न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर याचिका दाखल केली होती. पण त्या याचिकेत कोर्टाकडून काही चुका सांगण्यात आल्या होत्या. त्या सर्व चुका दुरुस्त करुन ईडीकडून आता मुंबई हायकोर्टात सुधारित याचिका दाखल करण्यात आली आहे. संजय राऊत यांची नुकतीच मुंबई सेशन कोर्टाच्या विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांची पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी जामिनावर सुटका केली. मात्र जेलमधून बाहेर येताना त्यांच्या जामिनास ईडीच्या वकिलांनी प्रचंड विरोध केला होता.
संजय राऊतांच्या वकिलांनी केलेल्या जोरदार युक्तीवादामुळे त्यांची जेलमधून सुटका झाली. राऊतांनी जेलमधून सुटून अवघे काही दिवस झाले असताना त्यांची अडचणी वाढवणारी आणखी ईडीकडून संजय राऊत यांच्या जामिनाला विरोध करणारी सुधारीत याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर ईडीने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. तसेच हायकोर्टात अर्ज दाखल करत राऊतांच्या जामिनाला विरोध करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी केली होती.
महत्त्वाचे म्हणजे कोर्टाने त्यावेळी पीएमएलए कोर्टाच्या निकालाच्या ऑर्डरची प्रत वाचली होती. तसेच हायकोर्टाने देखील संजय राऊतांची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. परंतु यावेळी हायकोर्टाने याचिकेतील काही चुका दाखवून दिल्या होत्या. त्यामुळे राऊतांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर ईडीकडून मुंबई हायकोर्टात संजय राऊतांच्या याचिकेला विरोध करणारी सुधारीत याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता नेमके काय होईल याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे.
Shivsena MP Sanjay Raut ED New Petition
Politics Money Laundering