मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांची कोठडी संपत असल्याने अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना आज विशेष न्यायालयापुढे हजर केले. राऊत यांची आणखी चौकशी करायची आहे, ते तपासात अद्यापही सविस्तर माहिती देत नाहीत, त्यामुळे आणखी कोठडी मिळावी, अशी विनंती ईडीच्या वकीलांनी न्यायालयात केली. मात्र, मला जिथे ठेवले आहे तिथे व्हेन्टिलेशन नाही, हृदयविकाराचा त्रास असल्याने श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे जामीन मिळावा, अशी मागणी राऊतांनी वकिला मार्फत न्यायालयाकडे केली. मात्र, न्यायालयाने राऊतांची मागणी फेटाळली आणि ईडीची मागणी मान्य केली. आता राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्याालयाने दिले आहेत.
मुंबईतील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्य्या घरी ईडीने छापा टाकला होता. तेव्हा ईडीला काही लाख रुपयांची रोकड सापडली होती. त्यानंतर ईडीने राऊत यांना ताब्यात घेतले आणि ईडी कार्यालयात आणले. तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर अखेर ईडीने राऊत यांना अटक केली होती. सर्वप्रथम त्यांना ३ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. ती आज संपली. त्यामुळे पुन्हा त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. बांधकाम व्यावसायिक प्रवीण राऊत यांनी संजय राऊत यांना १ कोटी रुपये दिले. संजय राऊत यांच्या बँक खात्यात हे पैसे कसे आले, त्याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे ईडीच्या वकीलांनी न्यायालयाला सांगितले. त्याची दखल न्यायालयाने घेतली. त्यामुळेच आज न्यायालयाने राऊत यांना आणखी ४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणी ८ ऑगस्ट रोजी होणार आहे. तोपर्यंत राऊत यांना तुरुंगातच रहावे लागणार आहे.
https://twitter.com/LiveLawIndia/status/1555107576391794688?s=20&t=YH54ad46eMyRvuW0u_MDfw
Shivsena MP Sanjay Raut ED Custody Hearing Patra Chawl Scam