मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अखेर शिवसेना खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. ईडीच्या पथकाने आज सकाळी ७ वाजताच राऊत यांच्या घरी छापा टाकला होता. आता ईडीचे पथक संजय राऊत यांना ईडी कार्यालयात घेऊन जाणार आहेत. तेथे त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीने आज तीन ठिकाणी छापे टाकून कागदपत्रांची तपासणी केली.
पत्रा चाळ प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना समन्स पाठवले होते पण ते हजर झाले नाहीत. हे प्रकरण १०३४ कोटींच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा हवाला देत संजय राऊत यांनी ईडी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास नकार दिला होता. हिंमत असेल तर एजन्सीने अटक करावी, असेही ते म्हणाले होते.
याच डीएचएफएल-येस बँक प्रकरणात ईडीने पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातही ईडीला संजय राऊत यांची चौकशी करायची आहे. DHFL प्रकरणही पत्रा चाळ प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे. एप्रिलमध्ये ईडीने संजय राऊत यांची ११.१५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. सकाळी संजय राऊत यांनीही ट्विट करून खोटी कारवाई, खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही, मी मेला तरी शरण येणार नाही, जय महाराष्ट्र, महाराष्ट्र आणि शिवसेनेचा लढा सुरू असल्याचे म्हटले होते.
https://twitter.com/rautsanjay61/status/1553709203432284162?s=20&t=Z96bUjO78gDZnP47hElxQg
Shivsena MP Sanjay Raut Detained by ED today