मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी हिचा शुभविवाह उद्या संपन्न होत आहे. यानिमित्त एक दिवस आगोदरच जय्यत असा समारंभ होत आहे. ऐरवी अतिशय कणखर, रोखठोक आणि करारी दिसणारे राऊत हे सध्या कन्येच्या विवाहानिमित्त वेगळ्याच मूडमध्ये दिसत आहेत. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
कन्या पूर्वशीच्या विवाह समारंभाची पत्रिका राऊत यांनी विविध मान्यवरांना दिली आहे. काही मान्यवरांना तर प्रत्यक्ष भेटीतून त्यांनी आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. आता हा सोहळा उद्या (सोमवार दि २९ नोव्हेंबर) होत आहे. पवईतील आलिशान हॉटेल असलेल्या रेनेसाँमध्ये होत आहे. गायक राहूल देशपांडे यांच्या गायनाचाही कार्यक्रम यात झाला आहे. राजकी, मनोरंजन, आर्थिक, प्रशासन अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती यास लाभत आहे.
पूर्वशी आणि मल्हार
संजय राऊत यांची कन्या पूर्वशी ही उच्चशिक्षित आहे. तिचे कार्यालय मुंबईतच सायन परिसरात आहे. राऊत यांनी साकारलेल्या ठाकरे या चित्रपटाची पूर्वशी ही निर्माती आहे. तर, राऊत यांच्या जावयाचे नाव आहे मल्हार. ते आयटी इंजिनीअर आहेत. मल्हार यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. मल्हार यांचे वडिल हे जिल्हाधिकारी आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे राऊत यांचे व्याही आहेत. नार्वेकर हे अत्यंत हुशार आणि अभ्यासू अधिकारी आहेत.