नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नेहमीच पत्रकार परिषदांमधून विरोधकांचा आपल्या खास शैलीत समाचार घेणारे शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यात क्रिकेटच्या मैदानावरही तुफान फटकेबाजी केली. राऊत हे शुक्रवारी (दि.२) नाशिक दौऱ्यावर आले. शिवसेना भवनात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्याआधी शासकीय विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. काही माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याचे चर्चा बघता संबंधितांची नाराजीही दूर करण्याचा प्रयत्न राऊत यांनी केल्याचे सांगण्यात आले.
त्रकारांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे देऊन विरोधकांचा समाचार घेणारे राऊत बॅट घेऊन चक्क क्रीकेटच्या मैदानात उतरल्याचे नाशिककरांनी पहिले. पहिला चेंडू सीमापार धाडत खेळण्याचा मनसोक्त आनंदही त्यांनी घेतला. सिडकोतील संभाजी स्टेडियमवर माजी नगरसेविका किरण दराडे यांचे पती बाळा दराडे यांच्यावतीने स्वर्गीय भास्कर गामने चषक क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत. त्या स्पर्धांचे उदघाटन राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते.
Shivsena MP Sanjay Raut Cricket Batting