मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने चार दिवसाची कोठडी सुनावली आहे. ही कोठडी ४ ऑगस्टपर्यंत असणार आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांना रात्री उशीरा अटक केली. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना न्यायालयात ३ वाजता हजर करण्यात आले. यावेळी झालेल्या सुनावणीत त्यांना चार दिवसाची कोठडी सुनावली आहे. न्या. एम. जी. देशपांडे यांच्या समोर ही सुनावणी झाली. यावेळी राऊत यांच्याकडून अशोक मुंदरगी यांनी बाजू मांडली तर ईडीकडून ईडीकडून हितेन वेणेगावकर यांनी युक्तीवाद केला. त्यानंतर न्यायालयाने ही कोठडी सुनावली.
ईडीकडून युक्तीवाद करत असतांना साक्षीदारांना धमकावल्याचा आरोप केला आहे. परदेश दौ-याबाबत व प्रवीण राऊत हे संजय राऊत यांना दोन लाख रुपये महिना देत असल्याचा आरोप ईडीने केला. तर राऊत यांच्याकडून युक्तीवाद करतांना राजकीय सूडापोटी केलेली ही कारवाई, राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर ही कारवाई केली आहे. राऊत यांच्याकडे आलेले पैसे हे कायदेशीरित्या असल्याचे सांगण्यात आले. या दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर न्या. देशपांडे यांनी कोठडी सुनावली आहे.
असा होता घटनाक्रम
रविवारी सकाळी ७ वाजताच ईडीच्या पथकाने राऊत यांच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर ईडीचे पथक संजय राऊत यांना ईडी कार्यालयात घेऊन गेले. तेथे त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना रात्री उशीरा त्यांना अटक करण्यात आली. राऊत यांना पत्रा चाळ प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना समन्स पाठवले होते पण ते हजर झाले नाहीत. हे प्रकरण १०३४ कोटींच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा हवाला देत संजय राऊत यांनी ईडी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास नकार दिला होता. हिंमत असेल तर एजन्सीने अटक करावी, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर ईडीने कारवाई करुन त्यांना अटक केली. त्यानंतर न्यायालयाने ही कोठडी सुनावली.
LIVE: राऊतांच्या अटकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद (व्हिडिओ) https://t.co/1JISshScvF
— India Darpan Live (@IndiaDarpanLive) August 1, 2022
Shivsena MP Sanjay Raut Court Custody ED