मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना नेते संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. लॉरेन्स बिश्नोई टोळीने बॉलिवूड स्टार सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीवर आरोप आहे.
पोलिसांनी सांगितले की, शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना धमकीचा मेसेज आला आहे. ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगने संजय राऊत यांना सिद्धू मुसेवाला गँगप्रमाणे मारले जाईल, अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी संजय राऊत यांनी फिर्याद दिली असून, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. संजय राऊत म्हणतात की, महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर आमची सुरक्षा काढून घेण्यात आली. आता आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
https://twitter.com/pallavig585/status/1642023902913388545?s=20
Shivsena MP Sanjay Raut Bishnoi Gang Threat