मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्राचा घोटाळा प्रकरणी सुमारे तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु आता त्या संदर्भात वेगळे कारण आहे मात्र मला अटक झाली तरी मी घाबरणार नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. कारण सीमा प्रश्न मी महाराष्ट्रासाठी लढतो आहे असे त्यांनी म्हटले आहे.
खासदार संजय राऊत यांना बेळगाव कोर्टाने समन्स बजावले आहे. दि. १ डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. हजर न राहिल्यास संजय राऊत यांना बेळगाव पोलीस अटक करु शकतात. ३० मार्च २०१८ रोजी संजय राऊत यांनी बेळगावात एक भाषण केले होते, हे भाषण प्रक्षोभक होते, असा आरोप कर्नाटक पोलिसांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले होते की, नागरिकांवर अन्याय केला तर महाराष्ट्रात याचे पडसाद उमटतील या वाक्यात प्रक्षोभक काय आहे, २०१८ मध्ये बेळगावात केलेल्या भाषणावर मला आता कर्नाटक पोलिसांची नोटीस आली आहे. मला कायदेशीर बाबीत अडकवून ठेवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. मात्र मला अटकेची भिती नाही, मला महाराष्ट्रासाठी अटक करणार असतील तर मी स्वत: जाईन. महाराष्ट्राविषयी कर्नाटक कोंडी करत आहे. शिवसेना सीमा बांधवांसाठी वचनबद्ध आहे. मला आता कर्नाटकात अटक होऊ शकते. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले.
कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला. मुंबईच्या पीएमएलए न्यायालयाने संजय राऊतांचा जामीन मंजूर केला. आता पुन्हा संजय राऊतांना अटक होणार असल्याचे बोलले जात आहे, यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परंतु मी शिवसेना घाबरणार नाही, मात्र मी आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे आणि मी या संदर्भात ठरवणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्नाटकवर बोलले आहेत. पण, या बोलण्यात काही दम नाही, असेही संजय राऊत म्हणाले. भाजप नेते सीमा प्रश्न दुटप्पी भूमिका घेतात असेही संजय राऊत यांचे म्हणणे आहे.
Shivsena MP Sanjay Raut Again Arrests Politics