मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांना पालघर जिल्हा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाने आज मोठी शिक्षा सुनावली आहे. दीड कोटी रुपयांचे चेक (धनादेश) बाऊन्स झाल्या प्रकरणी न्यायालयाने गावित यांना १ वर्षे तुरुंगवास आणि १ कोटी ७५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. जागेच्या व्यवहाराप्रकरणी गावित यांनी व्यावसायिक चिराग किर्ती बाफणा यांना चेक दिले होते. मात्र, ते बाऊन्स झाले. त्यानंतर बाफणा यांनी न्यायालयात धाव घेतली. खटला दाखल झाल्यानंतर त्याची सुनावणी झाली. आज अखेर न्यायालयाने निकाल दिला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते आणि खासदारांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.