नाशिक – पालकमंत्री छगन भुजबळ आणि नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्यानंतर आता पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. पालकमंत्री भुजबळांनी जिल्हा नियोजन समितीचा निधी विकला असल्याचा गंभीर आरोप आमदार कांदे यांनी केला आहे. याप्रकरणी आपल्याकडे बक्कळ पुरावे असल्याचा दावा करीत कांदे यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी कांदे यांनी भुजबळांसह जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांनाही प्रतिवादी केले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांमधील वाद थेट उच्च न्यायालयात गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नियोजन समितीचा निधी नसल्याने आपल्या मतदारसंघात विकास कामे करण्यात अडचणी येत असल्याचा आरोपही कांदे यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी न्यायालय काय दखल घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
भुजबळ आणि कांदे यांच्यात झालेल्या खडाजंगीचा व्हिडिओ