मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेला लागलेली गळती थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे सुद्धा नॉट रिचेबल झाले आहेत. ते काही वेळातच गुवाहाटीतील बंडखोरांच्या तंबूत दिसतील, अशी अटकळ बांधली जात आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेच्यावतीने राज्याच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे हे एकमेव मंत्री उरले आहेत.
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला लागलीले गळती सुरूच आहे. आतापर्यंत शिवसेनेचे तब्बल ३८ ते ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यात कॅबिनेट आणि राज्य मंत्र्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या कालच्या बैठकीला उपस्थित असलेले उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत हे आज अचानक नॉट रिचेबल झाले आहेत. सामंत हे सूरतमार्गे गुवाहाटी गाठणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आणखी एक कॅबिनेट मंत्री बंडखोरांच्या ताफ्यात चालले आहेत. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून बंडखोरांचे सत्ता व नाराजी नाट्य सुरू आहे. शिवसेनेने बंडखोरांवर कारवाईची भाषा करणे आणि काही हालचाली केल्या असतानाच सामंत हे गायब झाल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, शिवसेनेच्यावतीने मंत्रिमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यंटनमंत्री आदित्य ठाकरे हेच सेनेच्यावतीने उरले आहेत.
shivsena-minister-uday-samant-is-now-not-reachable maharashtra political crisis
Maharashtra Minister of Higher & Technical Education Uday Samant leaves for Guwahati from Surat.#MaharashtraPoliticalcrisis pic.twitter.com/RtnowRMB5f
— ANI (@ANI) June 26, 2022