नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या सत्ता आणि राजकीय संघर्षासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू झाली आहे. सरन्यायाधीश सी जी रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी होत आहे. आज काय निकाल याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.
शिवसेनेच्यावतीने ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, राजीव धवन, देवदत्त कामत हे युक्तीवाद करीत आहेत. सेनेचे बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवी आणि महेश जेठमलानी हे बाजू मांडत आहेत. तर राज्यपालांच्यावतीने सॉलिसीटर जनरल तुषार मेहता हे प्रतिनिधीत्व करीत आहेत. उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
न्यायालयातील महत्त्वाचे अपडेटस असे
उद्धव ठाकरे शिवसेना गटाचा युक्तीवाद
– हे प्रकरण घटनात्मक आणि संविधानात्मकरित्या अत्यंत महत्त्वाचे असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.
– दोन तृतीयांश सदस्य हे पक्षावर दावा करु शकत नाहीत. त्यांना अन्य पक्षात विलीन होणे बंधनकारक – सिब्बल
– आम्हीच मुळ पक्ष असल्याचा दावा बंडखोर करु शकत नाहीत – सिब्बल
– अशा प्रकारे लोकशाही धोक्यात येईल. आणि अनेक सरकारे कोसळतील – सिब्बल
– पक्षांतर बंदी कायद्याचे स्पष्टपक्षे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे या सदस्यांना अपात्र घोषित करणे आवश्यक आहे. – सिब्बल
– बंडखोरांचे वर्तनच सांगते आहे की त्यांनी पक्षाच्या नियमांची पायमल्ली केली आहे – सिब्बल
– घटनेच्या दहाव्या सूचीनुसार बंडखोर हे अपात्रतेस कारणीभूत – सिब्बल
– बंडखोरांनी मूळ पक्षाचा व्हिप नाकारला आहे. तसे स्पष्टपणे सिद्ध झाले आहे – सिब्बल
– दहाव्या सूचीनुसार हे सगळं बेकायदेशीर, मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष निवड सुद्धा बेकायदेशीर – सिब्बल
बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटाचा युक्तीवाद
– शिंदे गटाकडून ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवी यांच्याकडून युक्तीवाद सुरू
– पक्ष सोडला नाही त्यामुळे पक्षांतर बंदी लागू होत नाही – साळवे
– मुख्यमंत्री बदलणं हे पक्ष विरोधी कृत्य नाही – साळवे
– कुणी नेता म्हणे राजकीय पक्ष कसा असू शकतो – साळवे
– पक्ष विरोधी कारवाई किंवा पाऊल उचलले नाही – साळवे
– पक्षांतर बंद कायद्याचा चुकीचा अर्थ काढला जातोय – साळवे
– आमचे पक्षकार अजूनही शिवसेनेतच – साळवे
– निवडणूक आयोगाकडील प्रकरण आणि न्यायालयातील याचिका यांचा काहीही संबंध नाही – साळवे
– मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे चिन्ह कोणते – साळवे
– बैठकीला गैरहजेरी म्हणजे पक्ष सोडला असे नाही – साळवे
– शिंदे गटाकडून नीरज कौल यांच्याकडून युक्तीवाद सुरू
– महेश जेठमलानी यांच्याकडून जोरदार युक्तीवाद
– सरकार पडल्यानंतर नवे सरकार आले – जेठमलानी
– ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाही त्यामुळे त्यांनी बहुमत गमावले होते – जेठमलानी
–
खंडपीठाने उपस्थित केलेले प्रश्न आणि खंडपीठाकडून नोंदवलेली निरीक्षणे अशी
– सर्वप्रथम न्यायालयात धाव कुणी घेतली का घेतली
– विधानसभा उपाध्यक्षांच्या निकालापूर्वी न्यायालयात का आलात
– एखादा निर्णय झाल्यानंतर त्याविरोधात दाद मागणे ही सर्वसामान्य पद्धत असते
(ताजी माहिती जाणून घेण्यासाठी हे पेज रिफ्रेश करावे)
Maharashtra Political Crisis Supreme Court Hearing Started