मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. राऊत यांच्या पत्नी, आई, मुलगी आणि पुतणीला कोरोनाची बाधा झाली आहे. या सर्व जणांना सर्दी, ताप आणि खोकला अशी लक्षणी होती. त्यामुळे या सर्व जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली. हे सर्व जण घरीच विलगीकरणात आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने हे सर्व जण उपचार घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात अनेक मंत्री, आमदार आणि अन्य क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे.
सोनू निगमच्या कुटुंबातही कोरोना
प्रसिद्ध गायक सोनू निगम याच्या कुटुंबातही कोरोनाने एण्ट्री केली आहे. सोनू निगम, त्याची पत्नी आणि मुलगा असे तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. सोनू निगमने तशी माहिती व्हिडिओद्वारे दिली आहे.